Saturday, September 24, 2022

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे शिक्षकांना आवाहन

महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह ( MTS )आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇


🎆MTS तंत्र दीपोत्सव 2022 वर्ष तिसरे साठी लेख,ललित लेख,विनोदी लेख,कथा,कविता,चारोळी,विविधरंगी साहित्य पाठविणे बाबत...

        MTS म्हणजेच *" महाराष्ट्र  तंत्रस्नेही शिक्षक समूह "    निर्मित


 🏮"तंत्र दीपोत्सव दिवाळी अंक 2022 _वर्ष तिसरे"_

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

सर्व आदरणीय शिक्षक बंधू - आणि भगिनींनो, शिक्षक आणि विद्यार्थी विकासासाठी आपण शाळेत अनेक उपक्रम राबवत असतो. त्यातीलच एक उपक्रम  म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या लेखन अभिव्यक्तिला चालना मिळण्यासाठी तसेच विद्यार्थी विकासासाठी आपण राबवित असलेले उपक्रम सर्वांना माहीत व्हावेत आणि त्याचा इतरांना वापर करता यावा या उद्देशाने या उद्देशाने ' महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहा ' मार्फत दरवर्षी  दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. दरवर्षी आपण आपल्या समूहाचा दिवाळी अंक प्रकाशित करत असतो. या  दिवाळी अंकाच्या माध्यमातून  स्वलेखनातून आपल्या लेखन अभिव्यक्तिला संधी मिळावी यासाठी स्वलिखित तंत्रज्ञान लेख,सामान्य लेख, ललित लेख,चारोळी,विविध शालेय उपक्रम,रांगोळी, कथा,कविता इत्यादी साहित्य समूहातील सहभागी शिक्षक बंधू - भगिनी,नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि विद्यार्थ्यांकडून  मागवित आहोत.आपल्या समूहाचा सर्वांगसुंदर दिवाळी अंक अधिकच सुंदर,उपयुक्त आणि  वाचनीय होण्यासाठी आपले योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे. 

तंत्रज्ञानाची धरुनी वाट महाराष्ट्र करूया स्मार्ट

हे ध्येय वाक्य असलेल्या समूहाचा हा 

तिसरा डिजिटल दिवाळी अंक लवकरच म्हणजे या दिवाळीला प्रकाशित करीत आहोत. या अंकासाठी आपले स्वलिखीत साहित्य लवकरात लवकर  पाठवावे.ही विनंती.

  

🔖 अंकासाठी इच्छुकांनी विज्ञान लेख, ललितलेख,वैचारिक / शैक्षणिक लेख, कथा, कविता, गाणी, चित्रे, नाटुकली,नवोपक्रम,चारोळी,स्थानिक लोकभाषेतील कथा / कविता(खान्देशी, वऱ्हाडी, अहिराणी,भीली,पावरी,

कोकणी, मालवणी इ.) रांगोळी या प्रकारचे साहित्य आमच्याकडे पाठवावे ही विनंती.


👇 लेख आणि कविता लिहिण्यासाठी खालील विषयांचा वापर करता येईल* -


लेख विषय - 

१.शिक्षणात तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे तोटे

२.शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच असावे का?

३.कोरोना काळातील शिक्षण

४.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

५.स्वच्छता काळाची गरज

६.पर्यावरण 

७.नवीन शैक्षणिक धोरण

८.बदलती शिक्षण प्रणाली

९.राष्ट्रीय एकात्मता 

१०.संगणक काळाची गरज 

११. शाळा व समाज

१२.शिक्षकांची समाजातील भूमिका


*विशेष टीप/सूचना* 👇🏻

🎯 १)  लेखन हे स्वलिखित व अप्रकाशित असावे.


🎯 २)अंकासाठी लेखांची निवड आणि संपादन करण्याचा अधिकार संपादक मंडळाकडे असेल.


🎯 3) लेख / कथा/कविता/साहित्य व्हाट्सएपवर टाईपिंग केलेला किंवा वर्ड फाईल मध्ये लिहून पाठवावे.


🎯 ४ ) लेखामधील शुध्दलेखन तपासून घ्यावे.


५ ) एका सदस्यांचे जास्तीत जास्त दोन लेख किंवा एक लेख व कविता निवडण्यात येईल.


६ ) सर्व हक्क व अधिकार तसेच अंतिम निर्णय MTS कोअर टीम राखून ठेवत आहे.

🪀 लेख पाठवण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही.


🔶आपले लेख कृपया पुढील क्रमांकावर पाठवावे

सौ. शारदा चौधरी 9819477195

श्री. समाधान अहिरे 9881181615

श्री. संजय राठोड 9881268233

श्री. अमृतसिंग राजपूत 9423919409

सौ. कल्पना शाह 8169453563

श्री. सुनील बडगुजर 9923875125

श्री. सुधीर फडके  98908 98939

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🔶विनीत

प्रशासक तथा कोअर कमिटी महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा

 📲 महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 📱 ▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 🎈🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​ 🇲​🇹​🇸​🎈 ⭐ उन्हाळी सुटी निमित्त राज्यस्तरीय कथाकथन स...